BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत ढोल-ताशाच्या गजरात आणि शंख नाद करीत पुण्यातील मानाच्या कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग आणि केसरी वाडा या पाचही गणपतीचे सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत विसर्जन करण्यात आले. 

टिळक पुतळ्यापासून मानाचा पहिला कसबा पेठ गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग आणि केसरी वाडा गणपतीची मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, शंख नाद, गुलालाची उधळण करीत वेगवेगळ्या आकर्षक रथात या मिरवणुकी फुलल्या.

मानाच्या पहिल्या कसबा पेठ गणपतीचे मुठा नदीवरील नटेश्वर घाटावरील कृत्रिम हौदात बाप्पांची आरती करून सायंकाळी पावणेपाच वाजता भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्या पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी आणि गुरुजी तालीम गणपती या मानाच्या दुस-या आणि तिस-या गणपतींचेही विसर्जन येथेच करण्यात आले.

तर सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपती आणि पाचव्या केसरी वाडा गणपतीचे पांचाळेश्वर घाटावरील कृत्रिम हौदात गणेश विसर्जन करून मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीची भक्तीभावपूर्ण वातावरणात सांगता झाली.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती

मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती

मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती

HB_POST_END_FTR-A2

.