Alandi : इंद्रायणी नदीत अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

 एमपीसी न्यूज –  भारतरत्न,देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीचे आळंदीतील इंद्रायणी नदीत गुरुवारी (दि.23) अस्थी कलशाचे मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात आले. 
नगरप्रदक्षिणा मार्गावरून नाम गजरात अस्थी कलशाची मिरवणूक झाली .यावेळी वारकरी,नागरिकांची दर्शनास गर्दी झाली होती.दिंडीमिरवणुकीने आळंदीत अस्थी कलश इंद्रायणी नदीवर आणण्यात आला.येथे कार्यकर्त्यांनी दर्शनास गर्दी केली.इंद्रायणी नदी घाटावर पालक मंत्री गिरीश बापट यांचे हस्ते अस्थींची पूजा झाल्यानंतर श्रद्धांजली आणि अस्थिवर पुष्प अर्पण उपस्थितांनी केली.दरम्यान पसायदान झाल्यानंतर भारतरत्न अटलजी वाजपेयी यांचे अस्थींचे इंद्रायणी नदीत परंपरांचे पालन करीत विसर्जन करण्यात आले.

या प्रसंगी शांतिब्रम्ह मारोतीबुवा महाराज कुरेकर,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,पालकमंत्री गिरीष बापट,खासदार अनिल शिरोळे,भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संजय उर्फ  बाळा भेगडे,आमदार महेश लांडगे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, खेडचे प्रांत आयुष प्रसाद,आळंदीचे मंडलाधिकारी चेतन चासकर,पुणे शहर भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले,माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले,संजय घुंडरे,मंडूबाबा पालवे,दत्तात्रय काळे,विविध पक्षाचे आजी,माजी पदाधिकारी ,वारकरी  विद्यार्थी उपस्थित होते.
 सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,पालकमंत्री गिरीष बापट,शांतिब्रह्म मारोतीबुवा महाराज कुरेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.