Pune : लष्कर भागात विसर्जन मिरवणूक उत्साहात

एमपीसी न्यूज – पुणे लष्कर भागात विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. पुणे लष्कर भागातील भोपळे चौकातून सायंकाळी साडेसात वाजता मानाचा गणपती कामठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणुकीस लष्कर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ व लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते आरती करून श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यासचे सदस्य मनजितसिंग विरदी, सुनील शिंदे, प्रकाश अरगडे, शाम सहानी, विजय भोसले यांनी विसर्जन मिरवणुकीचे परीक्षण केले. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन रणवीर अरगडे, मनोहर परदेशी, आनंद शितोळे, जितेंद्र संघेलिया, मनोज व्हरांडे आदींनी केले होते. यावेळी सुशील खंडेलवाल, अमोल केदारी व पुणे कॅन्टोनमेन्ट शांतता समितीचे अध्यक्ष बापूसाहेब गानला, नगरसेवक अतुल गायकवाड, विकास भांबुरे, दिलीप भिकुले, प्रविण गाडे, असिफ शेख, वाहिद बियाबानी आणि सेंटरस्ट्रीट येथील कुरेशी नगर चौकात जमेतुल कुरेशी वर्किंग कमिटीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन जमेतुल कुरेशी वर्किंग कमिटीचे अध्यक्ष हसन अब्बास कुरेशी यांनी स्वागत केले. यावेळी अक्रम शेख, युसूफ बागवान, कादर सौदागर, सादिक कुरेशी, अबरार कुरेशी, अब्दुल अजीज कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मिरवणुकीत कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, साईनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हिंद तरुण मंडळ, राजेश्वर तरुण मंडळ, पापा वस्ताद तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवमुद्रा, श्रीपाद, नवयुग सुवर्णकार, उत्सव संवर्धक, कुंभारबावडी, सुयोग, धोबीघाट, शिव तरुण, कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ, नवयुग व नवमहाराष्ट्र व अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते. लष्कर भागातील ट्राय हॉटेल चौक, गुडलक चौक, कुरेशी मस्जिद चौक, सेंटर स्ट्रीट, भोपळे चौक, साचापीर स्ट्रीटवरील सरबतवाला चौक येथे मिरवणूक समाप्त झाली. यातील श्रीपाद व शिवमुद्रा मंडळे लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. तर साईनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ टिळक रोडवरील मिरवणुकीत सहभागी झाले.

श्री शिवराम तरुण मंडळ, श्रीकृष्ण तरुण मंडळ, श्री दत्त समाज तरुण मंडळ, एकता व दस्तूर तरुण मेहेर तरुण मंडळांनी जाग्यावर श्रीचे विसर्जन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व. नितीन आडसुळे यांच्या स्मरणार्थ नितीन आडसुळे मित्र परिवाराच्या वतीने पुलगेटजवळील डेक्कन टॉवरमागील नवा कालव्यावरील विसर्जन घाटावर तैनात असणाऱ्या जीवरक्षक व वाहतूक पोलीस बांधवांना अल्पोहाराची व्यवस्था केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.