Pune : पाठांतर चिंतन-मनन आणि मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व द्या – डॉ.गजानन एकबोटे

एमपीसी न्यूज – शिवाजीनगरमधील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल शाळेत दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.गजानन एकबोटे, प्रमुख पाहुणे विघ्नहरी देव, संस्थेचे कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, मिलिंद एकबोटे, डॉ.नंदकिशोर एकबोटे,डॉ.निवेदिता एकबोटे,चित्तरंजन कांबळे,उद्धव खरे,मृगजा कुलकर्णी,सांगिता लकारे,रोहिणी काळे,सीमा कुळधरण,पी.के.जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, संस्कृत ही अतिप्राचीन भाषा आहे. तसेच वेदांची जननी आहे, देव वाणी आहे, ज्ञानाचा महासागर असलेली संस्कृत भाषा खूप सुंदर असून संस्कृत पाठांतर स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो पाठांतर शिवाय पर्याय नाही.पाठांतरावर माणूस जीवनात मोठा होतो पाठांतर चिंतन-मनन वाचलेलं जन्मभर विद्यार्थ्यांना त्याची शिदोरी म्हणून पुरत असते. पूर्वी पाठांतराला भरपूर महत्त्व होते. मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे तरच विद्यार्थी परिपूर्ण घडतो आणि जीवनात यशस्वी होतो. आज मला आमच्या शिक्षकांची आठवण होते. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांची आठवण येईल असे शिक्षण दिले पाहिजे. अनेक शिक्षणतज्ज्ञ म्हणतात पाठांतर नको पण पाठांतर शिवाय शिक्षणाला महत्त्व नाही. संस्कृत भाषेचे व पाठांतराचे महत्त्व ओळखून आपल्या संस्थेने संस्कृत पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विघ्नहरी महाराज देव म्हणाले, संस्कृत मंत्राच्या उच्चारणामुळे स्मरणशक्ती वाढते, बुद्धी तल्लख होते. वाणी शुद्ध व स्पष्ट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेची आवड निर्माण केली पाहिजे.

पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व संस्कृत गीत सादर करून केले. मुख्याध्यापिका संगीता लकारे यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुण्यांचा परिचय शुभांगी घेवडे यांनी करून दिला.

पहिले बक्षीस – संस्कृत पंडित शहाजीराजे भोसले पुरस्कार- रूचा गोरीवले, आशा भालेकर, भक्ती रेणुसे, अनन्या गोवंडे, सानिया भंडारे, अनुश्री पोळेकर दुसरे बक्षीस – संस्कृत प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार- श्रेया जिरगे, सौम्या कुलकर्णी,सिद्धांत पटवे,नील पत्की,संदेश सरवदे,साक्षी मेहेंदळे तिसरे बक्षीस – लेखक छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार – प्रांजल महाडिक,निशा बन,मधुरा शेळके,आर्या गरगटे,आकांक्षा वाडेकर, ईशान ठाकूर या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. कार्यक्रम उत्साहात पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.