Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी भरती संदर्भात महत्वाचे आवाहन

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेत कर्मचारी भरतीबाबत निवडीची प्रक्रिया ठरलेली असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेत कर्मचारी भरती करावयाची झाल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती सविस्तर जाहिरात अधिकृत दैनिक व पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर प्रसिद्ध करण्यात येते.

याबाबतची पुणे महानगरपालिका अस्थापने वरील वर्ग -2 व वर्ग-3 मधील सरळसेवेने पदभरती करीता जाहिरात क्र. 1/398 दि.20/07/2022 अन्वये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Red Zone Nigdi : रेड झोन बाधित क्षेत्रातील लोकांचा संभ्रम जिल्हाधिकाऱ्यांनी दूर करावा – सतिष मरळ

पात्र उमेदवारांकडून https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येऊन कर्मचारी निवड समितीच्या अहवालानुसार पारदर्शकरित्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.

या प्रक्रियेव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने भरती हॉट नसून, कोणतेही एजंट किंवा अपरिचित व्यक्ती यांच्या मध्यस्थीने पद भरती संदर्भात आर्थिक व्यवहार न करण्याची सूचना महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.