Pimpri News : महत्त्वाची बातमी ! अपर तहसील कार्यालयाच्या वतीने ई-फेरफार नोंद व 7/12 दुरूस्ती शिबिर 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड अपर तहसील कार्यालयाच्या वतीने ई-फेरफार नोंद व 7/12 दुरूस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 28 आणि 29 जून रोजी मंडळ भाग भोसरी व चिंचवड येथे मंडळ मुख्य कार्यालयात तलाठी यांच्या उपस्थितीत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  

दोन्ही मंडळभागात एकुण 30 गावे येतात या गावातील शेतकऱ्यांनी 7/12 मधील गुणवत्ता आधारित विविध दुरूस्त्या करणे, संगणीकृत 7/12 चे वाचन करणे, नवीन फेरफार नोंदी दाखल करणे, प्रलंबित नोंदीची निर्गती व प्रमाणित 7/12 वितरण, विविध स्वरूपातील अहवाल दुरूस्ती करणे, अक्षरी भुमापन क्रमांक व गट नंबर दुरूस्ती करणे, अहवाल दुरूस्ती करणे व नोंदणीकृत नोंदी व अनोंदीकृत नोंदी बाबत कामकाज पूर्ण करण्यासाठी मंडळ भागात प्रथमच असे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. असे तहसीलदार गिता गायकवाड यांनी पञकाद्वारे कळविले आहे.

मंडळ भाग भोसरी मधील येणाऱ्या 15 गावांतील खातेदारांनी याचा लाभ घ्यावा असे अहवान मंडल अधिकारी  गणेश सोमवंशी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.