Pune : चारचाकीने फिरणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

Important news for Punekars traveling on four-wheelers, the Commissioner of Police tweeted the information पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाचा प्रकोप पाहता चारचाकी, रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांसाठी पुणे पोलिसांनी काही महत्त्वाचे नियम घालून दिलेत. पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली. यापुढे चारचाकी,  टॅक्सी किंवा रिक्षांमधून ड्रायव्हर सहित फक्त तिघांनाच प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. शिवाय लग्न समारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम करताना फक्त पन्नास लोकांना एकत्र येण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्याचा परिणाम असा झाला की पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. मागील दोन दिवसात दीड ते दोन हजार कोरोनाचे रुग्ण पुणे शहरात सापडले आहेत. सद्यस्थितीत पुणे शहरात सहा हजार 847 कोरोनाचे रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.  शिवाय नव्याने सापडणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  त्यामुळे पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

पोलिसांनी केलेल्या या नवीन नियमानुसार चारचाकी वाहनातून प्रवास करताना आता फक्त चालकासह तिघांनाच प्रवास करता येणार आहे. आणि या नियमाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात 50 हून अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.