Corona Vaccination: कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची ‘ही’ आहेत उत्तरे!

एमपीसी न्यूज – भारतात उद्यापासून (दि.16) जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमास सुरुवात होत आहे. सीरमची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेक या कंपनीची कोव्हॅक्सिन या दोन लसींना देशात मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिली आहेत. 

1) भारतात लागू केलेली लस इतर देशांमध्ये लागू केल्याप्रमाणे प्रभावी असेल का?

– होय. भारतात लागू केलेली कोविड-19 ची लस इतर देशांमध्ये विकसित करून लागू केल्याप्रमाणे प्रभावी आहे. तसेच लसीची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी लस चाचण्यांचे विविध टप्पे हाती घेण्यात आले आहेत.

 

2) लसीकरणास मी पात्र असल्यास मला कसे माहिती पडेल?

– पात्र असलेल्या लाभार्थ्यास त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी आरोग्य सुविधेविषयी व वेळापत्रकासंदर्भात सूचित करण्यात येईल.

3) कोविड-19 लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड का केली आहे ?

– भारत सरकारने सर्वाधिक जोखीम असलेल्या घटकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले आहे. आरोग्यसेवा कर्मचार्यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरकारचा असा विचार आहे की, या घटकांना कुठल्याही जोखमेशिवाय आपले काम करता यावे. यासाठी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांचा लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने निवडण्यात आलेल्या पहिल्या गटात समावेश केला आहे.

4) कोविड लस +ते +सेल्सिअस तापमानात साठवणूक करण्याची आणि आवश्यक तापमानात त्यांची वाहतूक करण्याची क्षमता भारताकडे आहे का?

– भारत जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालवितो, ज्यामध्ये 26 दशलक्षाहून अधिक नवीन जन्मलेल्या आणि 29 दशलक्ष गर्भवती महिलांच्या लसीकरणाची गरज भागवली जाते. देशातील मोठ्या आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्येची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रम यंत्रणा बळकट केली जात आहे.

5) उपलब्ध असलेल्या अनेक लसींपैकी एक किंवा अधिक लसी कोविडच्या नियंत्रणासाठी कशा निवडल्या जातात?

– लस संभाव्य व्यक्तीच्या नैदानिक/वैद्यकीय चाचण्यांमधील सुरक्षितता आणि कार्यक्षमता माहितीचा परवाना देण्यापूर्वी औषध नियामकांकडून तपासणी केली जाते. म्हणूनच, सर्व परवानाकृत कोविड-19 लसीची समतुल्य सुरक्षा आणि कार्यक्षमता असेल. परंतु, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की लसीकरणाचे संपूर्ण वेळापत्रक केवळ एका प्रकारच्या लसद्वारे पूर्ण झाले आहे, कारण वेगळ्या कोविड-19 लस बदलण्यायोग्य नसतात.

6) कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांसाठी एखादी व्यक्ती औषधी घेत असल्यास, तो/ती कोविड-19 ची लस घेऊ शकतात का?

– होय अगोदरच इतर आजार असलेल्या व्यक्तींना उच्च जोखमीच्या प्रकारात मोडले जाते. त्यांना कोविड-19 ची लस घेणे आवश्यक आहे.

7) आरोग्य सेवा पुरवठादाराचे कुटुंब/फ्रंटलाईन वर्कर ह्यांना देखील लस दिली जाईल का?

– प्रारंभिक गटात लसींचा मर्यादित पुरवठा असल्या कारणामुळे ह्या लसी प्रथम प्राधान्यक्रमात असलेल्या गटातील लोकांना देण्यात येतील. त्यानंतर, पुढील टप्प्यात गरजेनुसार लस इतर सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

8) नोंदणी शिवाय कोविड-19 ची लस एखाद्या व्यक्तीस मिळू शकते का?

– नाही, कोविड-19 च्या लसीकरणासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतरच लाभार्यासह सेशनच्या ठिकाणाची माहिती व वेळ शेअर केली जाईल.

9) एखादी व्यक्ती सेशनच्या/लसीकरणाच्या ठिकाणी आपले छायाचित्रीत ओळखपत्र दाखवण्यास सक्षम नसेल तर त्याचे/तिचे लसीकरण केले जाईल का?

– अपेक्षित व्यक्तीस लस दिली गेली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी लसीकरणाच्या ठिकाणी नोंदणी आणि पडताळणीसाठी छायाचित्रीत ओळखपत्र आवश्यक आहे.

10) पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

– नोंदणी करताना खालीलपैकी कोणतेही छायाचित्रीत ओळखपत्र सोबत बाळगावे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, ड्राइविंग लाईसन्स, पॅन कार्ड, जॉब कार्ड, पासपोर्ट, फेन्शनची कागदपत्रे कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड मनरेगा जॉब कार्ड एमपी/एमएलए/एमएलसी ह्यांनी अधिकृतरीत्या जारी केलेले ओळखपत्र बैंक / पोस्ट कार्यालयातून जारी केलेले पासबुक केंद्रीय/राज्य शासनाने/ पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी अदा केलेले सर्व्हिस ओळखपत्र

11) लसीचे किती डोस आणि किती अंतराने घ्यावे लागतील? लसीकरणाचा कोर्स / वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी एखाद्या

– व्यक्तीने लसीचे दोन डोस आहेत आणि ते अठ्ठावीस दिवसांच्या अंतराने घेणे आवश्यक आहे.

12) डोस घेतल्यानंतर अँटीबॉडीज/प्रतिपिंडे कधी विकसित होतात?

– कोविड-19 च्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी अँटीबॉडीजचे संरक्षणात्मक स्तर सामान्यतः विकसित होतात.

13) कोविड-19 ची लस एकाच वेळी सर्वांना दिली जाऊ शकते का?

– सरकारने उच्च जोखमीच्या गटांना शोधून प्राधान्याने लसीकरण करण्याचे ठरविले आहे. पहिल्या गटात आरोग्य सेवा अधिकारी व आरोग्य कर्मचारी (फ्रंटलाईन वर्कर), दुसऱ्या गटात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले व अगोदरच इतर आजार असलेल्या व्यक्ती त्यानंतर, गरजेनुसार लस इतर सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

14) अल्पकालावधीत ही लस विकसित केल्यामुळे ती सुरक्षित असू शकेल का?

– सुरक्षितता व कार्यक्षमता ह्यावर आधारित सिद्धता स्पष्ट केल्यावरच लस देशभरात देण्यास सुरुवात करण्यात येईल.

15) लस घेणे अनिवार्य/बंधनकारक आहे का?

– कोविड-19 साठी लसीकरण घेणे ऐच्छिक आहे. परंतु, स्वतःची सुरक्षा आणि रोगाचा प्रसार मर्यादित ठेवण्यासाठी कोविड-19 च्या लसीचे संपूर्ण वेळापत्रक प्राप्त करणे योग्य राहील.

16) कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी लस घेणे आवश्यक आहे का

– संसर्ग झाल्याचा मागील इतिहास जरी असला तरी स्वतःची सुरक्षा आणि रोगाचा प्रसार मर्यादित ठेवण्यासाठी कोविंड-19 च्या लसीचे संपूर्ण वेळापत्रक प्राप्त करणे योग्य राहील. आपली प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्यास मदत देखील करेल.

17) कोविड-19 (निदान झालेले / संशयित व्यक्ती) चा संसर्ग झालेल्या व्यक्तीस लसीकरण करता येते का?

– संसर्ग झालेल्या व्यक्तीने लक्षणांचे निराकरण झाल्यानंतर 14 दिवसांसाठी लसीकरण पुढे ढकलावे, कारण लसीकरणाच्या ठिकाणी विषाणूचा प्रादुर्भाव इतरांना होण्याचा धोका वाढू शकतो.

18) लसीकरणाच्या ठराविक दिवसाबद्दल लाभार्थ्यास माहिती कशी मिळेल

– ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्यसि त्यांच्या मोबाइल नंबरवर लसीकरणाची तारीख, ठिकाण व वेळ याविषयी एसएमएसद्वारे माहिती मिळेल.

19) संपूर्ण लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास त्याची माहिती मिळेल का

– होय. कोविड लसीचे योग्य डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यास त्याच्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे माहिती मिळेल. लसीचे सर्व डोस दिल्यानंतर त्याच्या मोबाईल नंबरवर क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्रही पाठविले जाईल.

20) लसीकरणाच्या ठिकाणी काही प्रतिबंधात्मक उपाय आणि काळजी घेणे आवश्यक आहे का?

– कोविड-19 ची लस घेतल्यानंतर कमीतकमी अर्धा तास लसीकरणाच्या केंद्रावर आराम करावा. मानसिक किंवा शारीरिक अस्वस्थता किंवा यातना होत असल्यास जवळील आरोग्य अधिका-यास/ एएनएम/आशा ह्यांना कळवावे.कोविड प्रतिबंधासाठी शिष्टाचाराचे पालन करण्याचे लक्षात ठेवा, जसे मास्कचा वापर करणे, हाताची स्वच्छता व शारीरिक अंतर (6 फूट अंतर) राखणे.

21) कोविड-19 च्या लसीकरणाच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत काय म्हणणे आहे?

– कोविड-19 च्या लसीला मान्यता मिळाल्यानंतरच लागू केली जाते. इतर लसींप्रमाणेच, काहीजणांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर सामान्य दुष्परिणाम, जसे सौम्य ताप, वेदना इ. होऊ शकतात. राज्यांना कोविड लसीशी संबंधित दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.