UPSC Exam : ‘युपीएससी’ परीक्षा पुढे ढकलणे अशक्य

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे युपीएससी कडून घेण्यात येणारी सिव्हिल सर्व्हिसेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणीदरम्यान युपीएससीच्या वकिलांनी म्हटलं की, ही परीक्षा पुढे ढकलणं शक्य नाही. सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा आधी 30 सप्टेंबरला होणार होती. त्यानंतर ती 4 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा 2020 च्या आयोजनाविरोधात युपीएससीच्या 20 उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली होती. ‘ही सात तास चालणारी ऑफलाइन परीक्षा आहे. सहा लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील आणि देशातील 72 परीक्षा केंद्रांवर याचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेचं आयोजन हे कोरोना संसर्गाचं कारण ठरू शकत,’ असं याचिकेत म्हटलं होतं.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं न्यायालयाला सांगितलं. परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयानं करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याचे आदेश आयोगाला दिले. या याचिकेवर आता बुधवारी अर्थात 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.