मार्केटयार्ड: जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळच्या मर्यादेत सर्व घटकांसाठी बाजार सुरू करणे अशक्य : बी. जे. देशमुख 

Impossible to start market for all components within the time limit fixed by the District Administration: B. J. Deshmukh.

एमपीसी न्यूज – प्रशासनाने लागू केलेल्या 10 दिवसांचा  लॉकडाऊन येत्या रविवार (दि. 19 जुलै) पासून काही अंशी शिथिल होणार आहे. जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेत सर्व घटकांसाठी बाजार सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे मागील लॉकडाऊनमध्ये जी वेळ ठरली होती. तशीच वेळ बाजार सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी केली आहे.

बाजार कशा पद्धतीने सुरू ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन मिळावे,  असे पत्र जिल्हाधिकारी आणि  महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसारच बाजार सुरू होईल.

त्यांच्या सूचना, मार्गदर्शन येईपर्यंत मुख्यबाजार आवार आणि उपबाजार बंद राहणार आहे. याची सर्व बाजार घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवार ( दि. 14 जुलै) पासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये सुरुवातीला 5 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.

त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 5 दिवस रोज काही तास सूट देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते.

दिनांक 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने आणि त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहणार आहेत.

Bइतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.