Chinchwad: साडेतीन शक्तीपीठे व नियोजित अयोध्या श्रीराम मंदिर दर्शनास उत्स्फूर्त गर्दी

एमपीसी न्यूज – चिंचवड नवरात्र उत्सवानिमित्त भक्तीमय वातावरणात देवीची तसेच  श्रीराम मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. राजेंद्र पवार, स्वाती पवार यांच्या हस्ते पूजा करुन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मकरंद बेलसरे यांनी पौराहित्य केले. दरम्यान, शक्तीपीठे व नियोजित अयोध्या श्रीराम मंदिर दर्शनास नागरिकांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती.

नवरात्र उत्सवानिमित्त चिंचवड नवरात्र महोत्सव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे 10 ते 18 ऑक्टोबर दरम्यान चिंचवडमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजित अयोध्या श्रीराम मंदिर देखाव्याच्या  उद्‌घाटनावेळी महापौर राहुल जाधव, ज्ञानप्रबोधिनीचे वा.ना.अभ्यंकर, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज , पश्चिम महाराष्ट्र धर्मजागरण प्रमुख हेमंत हरहरे ,अपर्णा कुलकर्णी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंदराव कुलकर्णी, विलास लांडगे ,रवी नामदे,  विश्व हिंदु परिषदेचे धनाजी शिंदे, संदेश भेगडे , चिंचवड मधील ज्येष्ठ धोंडीराम सायकर, नाना दामले, नीळकंठ चिंचवडे, स्मिता व रघुनाथ केतकर , केशव नेर्लेकर , रवींद्र घळसाशी,बजरंग दलाचे कुणाल साठे,  कारसेवक दीपक सिमंत, अविनाश तिकोने , जितेंद्र देव, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे , नगरसेविका अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते.

त्यानंतर रवींद्र देव संचलित ‘स्वानंद धुपारती’ मंडळाने श्री मोरया गोसावी यांची पदे सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री दत्तभजनी मंडळ गोखले वृंदावन आणि जोगेश्वरी भजनी मंडळ चिंचवड यांनी भजनसेवा दिली.

अयोध्येतील श्रीराम मंदिर संकल्प पूर्तीसाठी ‘श्री राम नाम जप’ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत अशी संकल्पना केली आहे. त्याला नागरिकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सायंकाळी मृणालिनी मराठे संचलित ‘कृष्ण कला मंच’ यांच्या वतीने रासगरबांचे सादरीकरण करण्यात आले.

धर्मजागरण संस्थेच्या वतीने ‘महादीप यज्ञ’ केला गेला. हेमंत हरहरे , अपर्णा कुलकर्णी , सुवर्ण भोजने , रुद्राणी नाईक , शार्दुल पेंढारकर आदींनी “महादीप यज्ञाचे” आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये महेश बारसावडे ,महेंद्र चिंचवडे ,महेश गावडे ,दत्ता संगमे ,गजानन वाल्हेकर ,संदीप दळवी ,माणिक म्हेत्रे ,बाळासाहेब वाल्हेकर ,दत्तात्रय भोंडवे ,दत्ता चिंचवडे यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.