Pimpri News: ‘सीएसआर’मधून YCMH मध्ये 150 एलपीएम क्षमतेचा ऑक्सीजन जनरेटर प्लॅन्ट

एमपीसी न्यूज – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आज (मंगळवारी) मेडीकल ऑक्सीजन जनरेटर प्लॅन्ट हस्तांतरीत केला. महापौर उषा ढोरे यांनी ही यंत्रसामुग्री स्वीकारली.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, डॉ. प्रवीण सोनी, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे जनरल मॅनेजर के. राजेंद्र, सिनीयर डेप्युटी जनरल मॅनेजर शामकुमार मोदी, चेतन औटी पाटील, अशोक राऊत, संजीव देशपांडे, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे उपस्थित होते.

भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने सीएसआर अंतर्गत रुग्णालयातील ट्राएज एरियाकरीता दिलेल्या मेडीकल ऑक्सीजन निर्मिती यंत्राची क्षमता 150 एलपीएम आहे. याचा उपयोग ट्राएज एरियामधील 20 पेक्षा जास्त रुग्णांना होणार आहे. या यंत्रामुळे ट्राएज एरियामध्ये ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता भासणार नाही अशी माहिती, डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

शहर कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून या काळात काही खाजगी कंपन्या सामाजिक बांधिलकीतून शहरावरील संकटाच्या विविध यंत्रसामुग्री देऊन महापालिकेस सहकार्य करीत आहेत त्याबद्दल महापौर ढोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.