Talewade News : अशुद्ध जलउपसा केंद्र उभारणार; 18 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंद्रायणी नदीवर तळवडे जवळ अशुद्ध जलउपसा करण्याची यंत्रणा आणि मुख्य कामकाजाचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच दहा वर्षासाठी इलेक्ट्रो, मॅकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन कामकाजासह देखभाल-दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी 18 कोटी 11  लाख रूपये खर्च होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

इंद्रायणी नदीवर निघोजे येथे 100 एमएलडी प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे. तळवडे जवळ करण्यात येणा-या या कामामध्ये अशुद्ध जलउपसा करण्याची यंत्रणा आणि मुख्य कामकाजाचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रो, मॅकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन कामकाजासह दहा वर्षासाठी देखभाल-दुरूस्तीचे कामकाज करण्यात येणार आहे. या कामासाठी 18 कोटी 13 लाख रूपये दर निश्चित करण्यात आला.

त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी योगिराज पॉवरटेक प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 0.10  टक्के कमी म्हणजेच 18 कोटी 11 लाख 58  हजार रूपये दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा योगिराज पॉवरटेक यांचा लघुत्तम दर असल्याने त्यांची निविदा स्वीकृत करण्यास महापालिका आयुक्त यांनी 10 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.