Imran Khan News : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केलं आहे. इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी चीनची कोरोना लस सिनोफार्म घेतली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.