India Corona Update : 24 तासांत 34,403 नवे कोरोना रुग्ण, 37,950 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – भारतात मागील 24 तासांत 34 हजार 403 नवे कोरोना रुग्ण सापडले असून, 37 हजार 950 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील कोरोना रिकव्हरी रेट देखील वाढून 97.75 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 33 लाख 47 हजार 325 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 25 लाख 98 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 3 लाख 39 हजार 056 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 431 कोरोना रुग्ण दगावले असून, भारतात आजवर 4 लाख 43 हजार 928 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 54 कोटी 77 लाख 01 हजार 729 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 79 हजार 761 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 77 कोटी 24 लाख 25 हजार 744 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 63.97 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.