India Corona Update : 24 तासांत देशात 14,313 तर, केरळमध्ये 6,996 नवे कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 14 हजार 313 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 6 हजार 996 रुग्ण एकट्या केरळमध्ये वाढले आहेत. तसेच 24 तासांत देशात 181 रुग्ण दगावले असून, त्यापैकी 84 रुग्ण केरळमधील आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 39 लाख 85 हजार 920 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 33 लाख 20 हजार 057 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 26 हजार 579 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 2 लाख 14 हजार 900 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 50 हजार 963 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 58 कोटी 50 लाख 38 हजार 043 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 11 लाख 81 हजार 766 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 95 कोटी 89 लाख 78 हजार 049 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 65 लाख 86 हजार 092 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.