Pune Crime News : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये मुलं, हाणामारी मात्र आई-वडीलांची

एमपीसी न्यूज – पुण्यातील हडपसर परिसरातून हा प्रकार उघडकीस आला आहे. रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या मुला मुलीत भांडण झाल्याने आई-वडीलांमध्येच हाणीमारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद भिकाजी बशिरे (वय 52) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार माधुरी बाचके, पारूबाई बाचके, मनोज पाटील, दशरथ बाचके, आकाश राऊत आणि रामदास लोहकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांची मुलगी दोघेजण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. त्याच कारणावरून रिलेशनशिपमध्ये रहाणाऱ्या मुलीने, आईने आणि आरोपीने फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर एका आरोपीने फिर्यादी यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला देखील मारहाण केली. यावेळी फिर्यादीची मुलगी ही मध्यस्थी करण्यासाठी आली असता तिला देखील लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. फिर्यादीच्या मुलाला देखील मारहाण करण्यात आली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Shilatne Accident : ट्रेलर आणि दुचाकी अपघातात आई, मुलाचा दुर्दैवी मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.