Election Commission of India : आळंदी मध्ये जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग नवमतदारांची नोंदणी विशेष शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) 1 जानेवारी 2023 अर्हता दिनांकावर छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम दि.9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करणे,मतदार यादीतून नाव कमी करणे,दुरुस्ती करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

जागतिक अपंग दिन या दिवशी दिव्यांग नवमतदारांची नोंदणी विशेष शिबीर दि.3 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आळंदी नगरपरिषद कार्यालय सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते.

Maval : टाकवे खुर्द व फांगणे येथील कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

जागतिक अपंग दिनानिमित्त यादिवशी नवमतदारांची नोंदणी व ज्या दिव्यांगांची मतदार यादीला नोंद आहे त्यांची नमुना क्र.8 भरून दिव्यांग मतदार यादीत नोंदणीकरीता फॉर्म भरून घेण्यात आले.तसेच त्यांची मतदान ओळखपत्राला आधार जोडणी करण्यात आली.

या शिबिरास आळंदी मधून दिव्यांग नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.हे शिबीर 8 डिसेंबर पर्यंत आळंदी नगरपरिषद कार्यालयामध्ये चालू राहणार आहे, याबाबतची माहिती पालिका कम्युनिटी ऑर्गनायझर अर्जुन घोडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.