Dehugaon : सराईत गुन्हेगाराचा पोलीस चौकी समोर खून

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगाराचा पोलीस चौकी समोर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना आज (शुक्रवार) देहूगाव पोलीस चौकी समोर घडली.

_MPC_DIR_MPU_II

शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय 35, रा. देहुची माळवाडी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर मागील सहा महिन्यांपूर्वी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. मागील काही दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला होता. आज दुपारी देहूगाव पोलीस चौकी समोरून जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये शंकर गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.