Moshi : मोशीमधील गंधर्व नगरीत दररोज आठ तास वीज गायब
राहिवाशी हैराण ; महावितरण प्राशसनाचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज : गेल्या 6 दिवसापासून मोशीमधील (Moshi) गंधर्व नगरी येथील रहिवासी विजेचा त्रास सहन करीत आहे. दररोज 8 ते 12 तास वीजबत्ती गुल होत आहे. सोसायटी धारकाना वीज नसल्यामुळे पिण्याच्या व वापरण्याचे पाणी नसल्याने हाल सहन करावे लागत आहे.
Alandi : 500 तुळशी रोपांचे वाटप करून साजरे करण्यात आले वाढदिवस
पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाही. नोकरदार वर्गाची धांदल उडत आहे. त्याचप्रमाणे, गंधर्व नगरी सोडुन कचरा डेपो, मोशी प्राधिकरण येथे वीज जात नाही. त्याचे कारण समजले नाही. नागरिकांना होणाऱ्या त्रासाला महावितरणचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचे रहिवाशी राहुल साठे यांनी सांगितले.
नागरिकांचे ज्यावेळेला वीज बिल थकित असतात. तेव्हा महावितरणचे कर्मचारी वीज खंडीत करण्यात तत्परता दाखवत आहेत. महावितरणने वेळेत काम करून वीज पुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी मोशीतील (Moshi) गंधर्व नगरी येथील रहिवासी करीत आहोत.