PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएलने कमावले तब्बल सव्वाआठ कोटी

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच गणशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा होतोय.त्यामुळे गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत पुण्यात भाविकांची एकच गर्दी होत आहे.याच गर्दीच्या काळात पीएमपीएलने मात्र 3 ते 7 सप्टेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत तब्बल 8 कोटी 27 लाख 45 हजार 732 रुपये कमावले आहेत.

प्रवासी नागरीकांचे सोयीकरीता प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही‘पीएमपीएमएल’ कडून गणेशोत्सव करिता नियमित बसेस व्यतिरिक्त जादा 654 बसचे नियोजन करण्यात आलेले होते.त्यामुळे नियमित व जादा अशा मिळून 8 हजार 143 बसेस गणेशोत्सव कालावधीत रस्त्यावर धावत आहेत. ‘पीएमपीएमएल’ने 3 ते 7 सप्टेंबर या कालावधीत एकूण 8 हजार 143 बसद्वारे 57 लाख 43 हजार 248 प्रवाशांनी प्रवास केला आहे.तसेच बसेस तपासणी दरम्यान विनातिकीट प्रवाश्यांकडून 2 लाख 91 हजार 600 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यामध्ये सर्वाधिक प्रवाशी संख्या ही 5 सप्टेंबर रोजी होती.त्या दिवशी तब्बल 12 लाख 90 हजार 600 प्रवाश्यांनी बस सेवेचा लाभ घेतला. याच दिवशी पीएमपीएमलचे उत्पन्नही सर्वाधीक म्हणजे 1 कोटी 79 लाख 40 हजार 714 रुपये एवढे होते. तर दंड वसूलीचा विचोरा केला असता 6 सप्टेंबर रोजी सर्वाधी म्हणजे 73 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सध्या पीएमपीएमएलच्या गणेशोत्सव कालावधीत जादा बसेस मार्गावर संचलनात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा वापर करावा, असे आवाहन पीएमपीएमएलच्यावतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.