Lonavala : कायदा व सुव्यवस्थेचा आदर राखत गणेश उत्सव साजरा करू – नवनित कावत

एमपीसी न्यूज – येणारा गणेश उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत आनंदात व उत्साहात साजरा करु असे मत लोणावळा उपविभागाचे नवनियुक्त पोलीस अधिकारी नवनित कावत यांनी व्यक्त केले.

गणेश उत्सव व मोहरमच्या निमित्त लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने नियोजनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवनियुक्त लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, वीज वितरण मंडळाचे उपअभियंता चव्हाण, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी, दत्तात्रय गवळी, प्रमोद गायकवाड, राजू गवळी, देविदास कडू, निखिल कविश्वर, सिंधू परदेशी, रमेश पाळेकर, विलास बडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी मंडळांना स्वच्छतेचा संदेश देणारी थिम घेत जनजागृती करण्याचे तसेच गुलाल विरहित मिरवणुका काढण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकपर मनोगतात बोलताना पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील म्हणाले यावर्षीचा गणेश उत्सव सणांमधील धार्मिकता कायम राखत सुरक्षिततेला महत्व देऊन पार पाडू असे सांगितले. विसर्जन मिरवणुकीकरिता यावर्षी प्रथमच वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

सर्व मानाच्या मंडळांनी वेळेच्या नियमांचे पालन केल्याने लोणावळा शहरातील विसर्जन मिरवणूक ही मावळातील सर्वात चांगली मिरवणूक होईल असे सांगितले. मिरवणुकीच्या डाव्या बाजूला महिला व उजव्या बाजूला पुरुष अशी व्यवस्था संपूर्ण विसर्जन मार्गावर करण्यात येणार असल्याने यावर्षी विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता महिलांची संख्या वाढेल तसेच त्यांना भयमुक्त वातावरणात मिरवणूक पाहता येईल, असा विश्वास व्यक्त केला.

लोणावळ्यातील मिरवणूक या डिजे व डाॅल्बीमुक्त असतात त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा मिरवणुकीवर कोणताही परिणाम होत नसला तरी प्रत्येकाने काळजी घेत व कायदा सुव्यवस्थेचे पालन करत हा सण साजरा करण्याचे आवाहन केले. विसर्जन मार्गावरील लोंबलेल्या विजेच्य‍ा तारा ओढून घेण्याचे तसेच गणपती काळात वीज खंडित होणार नाही. याची पूर्ण दक्षता घेण्याचे आश्वासन वीज वितरणचे चव्हाण यांनी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस कर्मचारी अमोल कसबेकर यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आभार मानले.

समूहगीत स्पर्धेत गुरुकुल व व्हिपीएस हायस्कूल प्रथम

राष्ट्रीय एकात्मता व जातीय धार्मिक सलोखा राखण्याकरिता लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित समूहगीत स्पर्धेत लहान गटात गुरुकुल हायस्कूल व मोठ्या गटात व्हि.पी.एस हायस्कूल यांना प्रथम क्रमांक मिळविला.

लहान गट : गुरुकुल हायस्कूल (प्रथम), संत गाडगेबाबा विद्यालय (द्वितीय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (तृतीय), संत ज्ञानेश्वर विद्यालय व रायवुड इंटरनॅशनल स्कूल (उत्तेजनार्थ)

मोठा गट : व्ही.पी.एस हायस्कूल (प्रथम),  अँड. बापुसाहेब भोंडे हायस्कूल (द्वितीय), गुरुकुल हायस्कूल (तृतीय), डाँन बाँस्को हायस्कूल व रामकृष्ण मोरे प्राथमिक विद्यालय खंडाळा (उत्तेजनार्थ)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.