India Corona Update : भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.78, मृत्यूचे प्रमाण 1.32 टक्के 

एमपीसी न्यूज – भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णापैकी 3 कोटी 28 लाख 76 हजार 319 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.78 टक्के एवढं आहे तर, मृत्यूचे प्रमाण 1.32 टक्के एवढं आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 29 हजार 616 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांत 28 हजार 046 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्याच्या घडीला देशात 3 लाख 01 हजार 442 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 46 हजार 658 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 56 कोटी 16 लाख 61 हजार 383 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 92 हजार 421 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 84 कोटी 89 लाख 29 हजार 160 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 71 लाख 04 हजार 051 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.