Thergaon : दोन लाखांसाठी विवाहितेला हातपाय बांधून मारहाण

एमपीसी न्यूज – माहेरहून दोन लाख रूपये घेऊन येण्यासाठी विवाहितेला सासरच्या मंडळींनी हातपाय बांधून मारहाण केली. तसेच पैसे नाही आणल्यास घरात घेणार नसल्याची धमकी देत शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार थेरगाव येथे नुकताच उघडकीस आला.

याप्रकरणी पती राज पोपट उदारे (वय 25), सासरे पोपट सोपान उदारे, सासु भारता पोपट उदारे, दिर ज्ञानेश्वर पोपट उदारे, अभिजीत पोपट उदारे, गजेंद्र पोपट उदारे, सुनिल पोपट उदारे, कोमल पोपट उदारे (सर्व रा. थेरगाव) यांच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 20 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.

माहेरहून दोन लाख रूपये घेऊन येण्यासाठी फिर्यादी यांना आरोपींनी तगादा लावला होता. पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करत हातपाय बांधून वारंवार मारहाण केली जात होती. पैसे नाही आणल्यास घरात घेणार नाही, अशी धमकीही दिली होती. दररोजच्या होणा-या त्रालासा कंटाळून विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सस्ते अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.