Supriya Sule : ”सासवा चिंग चिंग करतच राहतात”, ग्रामस्थांचे भांडण, सुप्रिया सुळे यांची मध्यस्थी

एमपीसी न्यूज : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या आपल्या मतदारसंघात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. मतदार संघातील गावागावात जाऊन त्या मतदारांशी संवाद चालत आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. त्या बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गावाच्या दौऱ्यावर होत्या. गावातील नागरिकांसोबत त्या गावातील कामांचा आढावा घेत असताना गावातीलच दोन गट आमने-सामने आले. गावातील रस्त्याच्या कामावरून हे दोन्ही गट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समोरच एकमेकांना भिडले. मात्र सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या गावकऱ्यांना शांत केले.

यानंतर गावकऱ्यांशी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी गावकऱ्यांना आपल्याच घरातील एक उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनीच्या लग्नाला 35 वर्षे झाली. मात्र चकली किंवा लाडू वळत असताना माझी आई किंवा आशा काकू म्हणत असतात, तेल गरम आहे का, नाही तर चकली खराब होईल, लाडू नीट वळा, असे काही ना काही सतत सांगत असतात. दिसत नसलं तरी चष्मा घालून सल्ले देतात. सासवा म्हटलं, की चिंग चिंग करतच राहतात. चांगल्या गोष्टीसाठीच असतं हे.

Haveli News : घरगुती सिलेंडरच्या वायू गळतीने घरामधे आग; महिला जखमी 

असे म्हणत त्यांनी (Supriya Sule) गावकऱ्यांच्या रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी सांगताना त्या हेही म्हणाल्या, की चांगल्या कामासाठी आपापसात तुम्ही भांडलातही चांगली गोष्ट आहे. परंतु, आम्ही तुमचं ऐकून घेण्यासाठी तयार असताना तुम्ही अशा प्रकारे आपापसात भांडण करणे योग्य नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.