Corona Vaccine Update : महाराष्ट्रात पहिल्या दिवशी 28,500 जणांना मिळणार लस

आजपासून लसीकरणाला सुरुवात,

एमपीसी न्यूज : आजपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना मंजूरी दिली होती. त्यानंतर आता लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.

शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

पहिल्या दिवशी देशभर सुमारे तीन लाख करोना योद्धय़ांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. लसीकरणासाठी 1075 हा मदतसेवा क्रमांक 24 तास कार्यरत असेल.

राज्यात 284 केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून पहिल्या दिवशी 28 हजार 500 कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.