Maval Corona Update : मावळ तालुक्यात 10 नवे कोरोना रुग्ण, सक्रिय रूग्णांची संख्या 47

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवार (दि.8) 10 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 47 आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही. तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 04 रूग्ण सापडले तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1 रूग्ण सापडला. सध्या रूग्णालयात 47 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7982 झाली आहे.’

तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 05 रुग्ण तर ग्रामीण भागात कान्हे व खांडी येथे प्रत्येकी एक  तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथे 03 रूग्ण सापडले.

ग्रामीण भागात 05  रूग्ण सापडले तर शहरी भागात 05 रूग्ण सापडले आहेत. तर 47 रुग्ण सक्रिय आहेत. 7711 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2389, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1584 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 534 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4507 रुग्ण तर ग्रामीण भागात 3475रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.