_MPC_DIR_MPU_III

Pimpri : माझ्या राजकीय प्रवासात कामगार वर्ग सुरुवातीपासूनच सोबत – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचा कणा म्हणून कामगारवर्ग ओळखला जातो. माझ्या राजकीय प्रवासात हा कामगारवर्ग अगदी सुरुवातीपासून सोबत आहे. विविध कंपन्यांमधील कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठामपणे माझ्यासोबत कायम उभे आहेत, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_IV

या मेळाव्यात उपस्थित कामगारांशी संवाद साधताना आमदार महेश लांडगे बोलत होते. पिंपरी, चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यातील अंतर्गत आणि बाह्य कामगार संघटनांचे अध्यक्ष कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या सर्व युनियनच्या अध्यक्षांनी आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा दिला.

सर्व युनियनचे अध्यक्ष ज्यांचे भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदान आहे, त्या सर्वांचे मतदान करून घेणार आहेत. तर ज्यांचे मतदान नाही, असे सर्व कार्यकर्ते पुढील 21 दिवस प्रचाराचे काम करणार आहेत. यावेळी महापौर राहुल जाधव, टाटा मोटर्स कामगार युनियनचे माजी अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, प्रकाश मुगडे, हनुमंत लांडगे, जीवन येळवंडे, रोहिदास गाडे, संतोष बेंद्रे, किसान बावकर, शाम सुळके, काशिनाथ नखाते, मच्छिंद्र दरवडे, श्रीयुत दरेकर, श्रीयुत गोरे, सचिन लांडगे यांच्यासह अनेक कामगार नेते उपस्थित होते. कामगार संघटनेकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. हा धनादेश कामगारांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आमदार महेश लांडगे म्हणाले, औद्योगिक नगरीसह कामगार नगरी म्हणून देखील पिंपरी-चिंचवड शहराची ओळख निर्माण झाली आहे. कामगारांमुळे पिंपरी-चिंचवड शहराला विविध संस्कृतीचा वारसा मिळाला आहे. कामगारांच्या विविध प्रश्नांभोवती शहराचा विकास झाला आहे. कामगारांनी मोठ्या कष्टाने शहरात घरे घेतली. ती शासनाने अनधिकृत ठरवली. त्यावेळी कामगारांसोबत उभा राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाची चळवळ उभी केली. ज्यांनी ज्यांनी कामगारांच्या हितासाठी लढा दिला, त्यांच्या स्मृती शहरात कायम आहेत. कामगारांच्या विकासामुळे शहराचा विकास झाला आहे. त्यामुळे कामगारांसाठी लढणा-यांची नावे उड्डाणपूल, चौक, रस्त्यांना दिली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

संतोष बेंद्रे म्हणाले, “भूमिपुत्रांना कामगार कायद्यात स्थान नाही. त्यामुळे कामगारांची मोठी हेळसांड होते. ही कामगारांची हेळसांड कमी होण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा लढा सुरु आहे. अनेक कंपन्या कामगारांबाबत मुजोरपणाची वागणूक देतात. कामगारांना अचानक कामावरून काढले. तसेच अनेक वर्षांपासून कंपनीत काम करणा-या कामगारांना अजूनही कमीच पगार देतात. अनेक कंपन्यांना आधाराची गरज आहे. कामगारांच्या सोबत आपण सर्वजण कंपन्यांचा आधार बनून उभे राहणार आहोत. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांचेच नेतृत्व हवे आहे.”

जीवन येळवंडे म्हणाले, “कामगारांच्या विकासाची दारे आमदार महेश लांडगे यांनी खुली केली. कामगारांच्या आदर्श जीवनासाठी आमदार लांडगे सातत्याने प्रयत्नशील आहेत. ज्या कामगारांची घरे रस्त्यात गेली, त्या कामगारांना आमदार लांडगे यांनी घरे मिळवून दिली. असाच उमेदवार कामगारांना आमदार म्हणून हवा आहे. कामगार नगरीतला कामगार आमदार लांडगे यांच्याकडे परमनंट आमदार म्हणून पाहत आहे.”

विष्णुपंत नेवाळे म्हणाले, “2014 साली भोसरीकरांसह कामगारांनी मिळून आमदार महेश लांडगे यांना भरघोस मतांनी निवडून दिले. त्या विजयाची आता पुनरावृत्ती करायची आहे. आमदार महेश लांडगे यांनी अनेक कुरघोड्या पाहिल्या आहे. त्यांच्यावर कुरघोड्या होत असताना देखील त्यांनी कामगारांच्या प्रश्नांचा पाठपुरावा कायम सुरु ठेवला आहे. कामगारनगरीत कामगारांचे काही प्रश्न जटिल झाले आहेत. ते सोडविण्यासाठी आमदार लांडगे पुढील काळात प्रयत्न करतील. त्यासाठी आमदार लांडगे यांना पुन्हा एकदा आपण संधी द्यायची आहे. कामगार नगरी म्हणून या शहराची ओळख असली तरी आजपर्यंत कामगार आयुक्त कार्यालय या शहरात नाही. ते आणण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न करावेत, असेही नेवाळे म्हणाले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.