PMPML : पीएमपीएमएलच्या एका शिफ्टमध्ये एका बसने आणले तब्बल 22 हजारांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या (PMPML) एका बसने एका शिफ्टमध्ये तिकीट विक्रीतून तब्बल 22 हजार 535 रुपयांचे उत्पन्न आणले आहे. हे उत्पन्न 29 जानेवारी रोजी हडपसर ते जेजुरी या मार्गावर कमावले आहे.

या बसचे वाहक म्हणून राजू चिंतामण पराते व चालक म्हणून प्रदीप सुतार यांनी काम पाहिले आहे. रविवारच्या दिवशी नागरिकांनीही पीएमपीएमएलला पसंती देऊन हा विक्रम साधण्यास एक प्रकारे मदत केली. या कामगिरीबद्दल पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार यांनी वाहक राजू पराते व चालक प्रदीप सुतार यांचे अभिनंदन केले.

NCP News : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक; स्वत:च दिली माहिती

रविवारी जादा हडपसर ते जेजुरी या मार्गावर सकाळ (PMPML) पाळीच्या सहा बस धावत होत्या. यामध्ये 1 बस नियमित शेड्युलची व 5 बसेस जादा सोडण्यात आल्या होत्या. या 6 बसेसपैकी एका बसवर राजू पराते वाहक तर प्रदीप सुतार चालक म्हणून काम करीत होते.

त्यांनी त्यांच्या शिफ्टमध्ये बसच्या तीन फेऱ्या केल्या. त्यात त्यांनी 22 हजार 535 रुपयांची तिकीट विक्री केली आहे. हडपसर ते जेजुरी मार्गावर रविवारी गर्दी असल्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना घेऊन जाण्याचा प्रयत्न पीएमपीएमएलने केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.