Pune News : पुण्यात 14 वर्षीय मुलाची दुचाकी झाडाला धडकली, जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील मुंढवा परिसरात भरधाव वेगाने जाणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास केशव नगर मुंढवा येथे हा अपघात झाला. मुंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा ही दुचाकी चालवत होता. भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालणारी ही दुचाकी नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या लिंबाच्या झाडाला जोरात धडकली.

त्यामध्ये या अल्पवयीन मुलाच्या डोक्याला आणि तोंडाला जबर दुखापत झाली होती. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर गाडीच्या पाठीमागे बसलेला आणखी एक मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.