Pune News : पुण्यात निर्घृण खून, काठीने मारहाण करून अन् डोक्यात फरशी टाकून तरुणाला संपवले

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. बाळू पारधी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंचर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मंचर घोडेगाव रस्त्यावर हा खून करण्यात आला. अज्ञात मारेकऱ्यांनी बाळू पारधी या तरुणाला काठीने मारहाण केली आणि डोक्यात फरशी टाकून त्याचा निर्घृण खून केला.

मयत तरुण हा आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी येथील रहिवासी आहे. मात्र त्याच्या खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मंचर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.