Pune News : पुण्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाचा निर्घृण खून, पोलीस घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज : हडपसर परिसरात एका 31 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. सोमवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

विकास सोनवणे (वय 31) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पैशाच्या वादातून हा खून झाला आहे. विकासाच्या मित्रांकडून काही तरुणांनी उसने पैसे घेतले होते. या पैशाच्या वादातूनच रविवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. यावेळी त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने वार करत विकासचा खून केला.

लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून काही संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.