Pune : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात तब्बल 85 उमेदवार रिंगणात, तर सर्वात कमी उमेदवार खडकवासला मतदारसंघात

21 मतदारसंघात 445 उमेदवारांनी केले 595 अर्ज दाखल; उद्या छाननी

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात तब्बल 85 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 9 उमेदवार खडकवासला मतदारसंघात रिंगणात आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. पुणे जिल्ह्यातील एकवीसही निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. शेवटच्या दिवशी वाजत गाजत तब्बल 311 उमेदवारांनी 401 अर्ज दाखल केले. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात 445 उमेदवारांनी 595 अर्ज दाखल केले. उद्या या अर्जांची छाननी होणार आहे.

जुन्नरमध्ये 13, आंबेगाव 12, खेड – आळंदी 13, शिरूर 19, दौंड 20, इंदापूर 21, बारामती 13, पुरंदर 19, भोर 13, मावळ 11, चिंचवड 19, पिंपरी 35, भोसरी 20, वडगावशेरी 23, शिवाजीनगर 13, कोथरूड 25, खडकवासला 9, पर्वती 10, हडपसर 22, पुणे कॅन्टोन्मेंट 85, तर कसबा मतदारसंघात 15 उमेदवार नशीब अजमावत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.