Pune: जिल्ह्यात आज 79 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 2201 तर मृतांचा आकडा 120 वर

एमपीसी न्यूज – पुणे शहरासह जिल्ह्यात आजपर्यंत 18 हजार 097 व्यक्तींच्या कोरोना तपासणी पूर्ण झाल्या असून त्यात 2 हजार 201 व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. त्यापैकी 608 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1 हजार 473 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 86 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 120 इतकी झाली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली. 

जिल्ह्यात एकूण 18 हजार 097 रुग्णांच्या कोरोना निदान चाचण्या झाल्या. त्यापैकी 15 हजार 527 चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 2 हजार 201 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज कोरोनाच्या नवीन 79 रुग्णांची नोंद झाली. अद्यापि 369 चाचण्यांचे अहवाल मिळणे बाकी आहे.

पुणे शहरात आज 62 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोनावर यशस्वी मात केलेल्या 52 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाबाधित चौघांचा आज शहरात मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 1 हजार 943 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 535 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 111 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात अजून 1 हजार 312 कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 76 रुग्णांची प्रकृती गंभीर किंवा चिंताजनक आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत एकूण 133 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 55 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात अजून 74 कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 4 रुग्णांची प्रकृती गंभीर किंवा चिंताजनक आहे.

पुणे शहर, ससून रुग्णालय व पिंपरी-चिंचवड वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भाग व अन्य रुग्णालयांमध्ये आतापर्यंत एकूण 120 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 23 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या क्षेत्रात अजून 87 कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी सहा रुग्णांची प्रकृती गंभीर किंवा चिंताजनक आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.