Pune : विभागात 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्य तर 13 हजार 33 क्विंटल भाजीपाल्याची आवक

 एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33  क्विंटल भाजीपाल्याची आवक   झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

विभागात 2 हजार 784 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 5 हजार 82 क्विंटल इतकी झाली आहे. पुणे विभागात 27 एप्रिल 2020 रोजी 97.80 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.55 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 154 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 260 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 414 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.    या कॅम्पमध्ये 33 हजार 81 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  4 हजार 890 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.