Pune Crime News : पुण्यातील ‘त्या’ 50 हजाराच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महिलेला अटक

एमपीसी न्यूज – खटला मॅनेज करण्यासाठी 50 हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणात थेट महिला न्यायाधीशाला अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एका खाजगी महिलेने न्यायाधीशांना मॅनेज करून फौजदारी खटला मॅनेज करुन देण्यासाठी एका खाजगी महिलेला 50 हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. या प्रकरणात आता न्यायाधीशाला अटक करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अर्चना दीपक जतकर (मावळ) असे अटक केलेल्या महीला न्यायधीशाचे नाव आहे. त्या वडगाव मावळ न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जानेवारी महिन्यात खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय 29) यांना एसीबीने 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर चौकशीमध्ये या प्रकरणात न्यायाधीश अर्चना जतकर यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानुसार आज लाचलुचपत विभागाने न्यायाधीश अर्चना जतकर याना अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी निलंबित पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांना अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.