Pune : पुण्यात सराईत सोनसाखळी चोरास बेड्या

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईताला पुणे (Pune) आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हि कारवाई शुक्रवारी (दि.4) कर्वेनगर येथे केली. प्रवीण मधूकर डोंगरे (वय 23 रा कर्वेनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना खंडणीविरोधी पथकाला बातमीदार मार्फत खबर मिळाली की, सोनसाखळी चोरी करणारा आरोपी हा कर्वेनगर परिसरात आहे. पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबुल केला. यावेळी त्याच्याजवळील गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. डोंगरे हा केवळ मौजमजेसाठी चोऱ्या करत होता. त्याने 1ऑगस्ट रोजी एका वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरल्याचा गुन्हा अलंकार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. आरोपीला (Pune) अलंकार पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

Nigdi Police : निगडी पोलिसांनी पाच आरोपींना मिळवून दिली शिक्षा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86be34774d828197',t:'MTcxMTY5Nzk1Ni45OTYwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();