Pune News : पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील गारठा वाढला

एमपीसी न्यूज :   गेल्या तीन दिवसांपासून शहरात किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी नोंदविले. पुण्यात किमान तापमान १५.अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, पुढील दोन दिवसांमध्ये १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला.

पुण्यात ३१ ऑक्‍टोबरला १५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर किमान तापमानाचा पारा १८.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. गेल्या तीन दिवसांमध्ये दोन अंश सेल्सिअसने तापमान कमी होऊन, ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजता १५.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये आकाश निरभ्र रहाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्याचवेळी कमाल तापमान ३१ आणि किमान १५ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. शहरातील आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्‍क्‍यांपर्यंत आहे.

राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गारठा वाढत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. येत्या काही दिवसांत राज्यात थंडी काही प्रमाणात वाढणार आहे. बुधवारी (ता. ४) सकाळी आठपर्यंत सर्वांत कमी तापमान चंद्रपूरमध्ये १२.२ अंश सेल्सिअसची नोंदले गेले.

राज्यातील किमान तापमान
मुंबई २५, रत्नागिरी २२.५, डहाणू २३.५, पुणे १५.१, जळगाव १५.२, कोल्हापूर १९.४, मालेगाव १७.४, नाशिक १५.४, सांगली १८.३, सातारा १६.५, सोलापूर १६.४, औरंगाबाद १६.३, बीड १६.९, परभणी १४, नांदेड १७, अकोला १५.६, अमरावती १३, बुलडाणा १६.६, चंद्रपूर १२.२, गोंदिया १३.६, नागपूर १२.८, वर्धा १४.४.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like