Pune News : पुण्यात एकाच रात्रीत तीन घरफोड्या, आठ लाखाचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज : पुण्यातील चतु:शृंगी, खडकी आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या मध्ये चोरट्यांनी तब्बल सात लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मंगळवारी आणि बुधवारी रात्रीच्या सुमारास या घटना घडल्या. 

चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मॉडेल कॉलनी येथील स्नेही कॉम्प्लेक्स या इमारतीत असणारे एक गोडाऊन अज्ञात चोरट्यांनी फोडले. यामधून त्यांनी दोन मायक्रोवेव दोन कुलर आणि दोन एसी चोरून नेले आहेत.

निलेश नीलम गोठी (वय 45) यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दुसऱ्या एका घटनेत चोरट्यांनी खडकी बाजार येथील नीता कॉर्नर या इमारतीतील फ्लॅट फोडून सहा लाख 17 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

सेफ्टी दरवाजा लॉक तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत ही घरफोडी केली. याप्रकरणी भावेश शांतीलाल नहार (वय 41) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरा एका घटनेत चोरट्यांनी हडपसर येथील वेताळबाबा वसाहतीत जबरी चोरी करत एक लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

फिर्यादी ताराबाई बाळासाहेब नागे (वय 61) यांच्या घराचे लॉक तोडून अज्ञात आरोपीने घरामध्ये प्रवेश करत लोखंडी पेटीतून 76 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.