Pune News : कॅम्पमध्ये ‘हम इधर के भाई है’ म्हणत तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर दोघा जणांनी एका तरुणाला ‘हम इधर के भाई है’ असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण केली. कॅम्प परिसरातील कुरेशी मज्जिद जवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. 

आफ्ताब उर्फ अफी शेख आणि आफताब शेख याचा मित्र समीर या दोघांविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सनी प्रकाश कुराडे (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला फिर्यादीच्या गाडीचा धक्का लागला होता. या कारणावरून आरोपीने त्यांना शिवीगाळ करत गाडीची काच फोडली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असताना आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून लाकडी दांडके व लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केले.

तसेच ‘हम इधर के भाई है’ असे म्हणत हातातील हत्यारे दुकानदार व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दाखवत दहशत निर्माण केल्या. त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी घाबरून आपली दुकाने बंद केली व रस्त्याने जाणारे लोक देखील पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.