Pune : डी एस के प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार 

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. 

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पद आणि अधिकाराचा गैरवापर करत कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता आणि विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.