Crime news: खुनाच्या प्रकरणात आरोपी दोन तासात हडपसर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज : हडपसर पोलिसांनी खुनाच्या प्रकरणात आरोपीला खून झाल्यापासून दोन तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.
आरोपी कृष्णा रेखले (वय 27 वर्षे राहणार कवडी गाव टोल नाका, लोणी काळभोर, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. 25 सप्टेंबरला रात्री 8:45 वा. चे सुमारास सागर गायकवाड हा डोक्यामध्ये गंभीर जखमा आणि रक्तस्राव होऊन बेशुद्ध अवस्थेत नारळबाग केशव चौकाजवळ माळवाडी हडपसर पुणे येथे पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तपास पथकातील अधिकारी विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक तसेच अमलदार समीर पांडुळे प्रशांत दुधाळ, निखिल पवार, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे अनिरुद्ध सोनवणे अतुल पंधरकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचवून तपास सुरू केला.

पोलीस अंमलदार प्रशांत टोणपे यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी रेखले याला ताब्यात घेण्यात आले. तपासात कळाले की आरोपी रेखले याने भंगार विक्रीतील पैसे वाटपाच्या वादावरून भांडणात सागर गायकवाड यास बांबूने आणि दगडाने मारहाण करून ठार मारले आहे. मयत व आरोपी दोघेही रिक्षा चालक आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्यार रक्ताने माखलेला मोडका बांबू ताब्यात दिला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भा.द.वि कलम 302, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1), सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चेतन थोरबोले, सहायक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.