Pune : विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणारा शिपाई पोलिसांच्या ताब्यात

 कोथरुडमधील इंग्लिश मिडियम शाळेतील प्रकार

एमपीसी न्यूज – कोथरुड येथील एका इंग्लिश मिडियम शाळेतील तीन विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संभाजी रघुनाथ चौधरी (वय 47 रा.कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. तब्बल आठ महिने हा प्रकार तेथे घडत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील एका इंग्लिश मिडियम शाळेत फेबुवारी ते  ऑक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत तेथील शिपाई संभाजी चौधरी याने शाळेतील तीन विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडिओ दाखवल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक आणि पालकांना घडलेला प्रकार सांगितला व विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार
संभाजी चौधरी विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानुसार कारवाई करत तात्काळ शिपायाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.