-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : दुहेरी हत्याकांड, आईचा मृतदेह सासवडला तर मुलाचा मृतदेह कात्रजच्या घाटात आणि वडीलही बेपत्ता

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पुण्यात खुनाचा एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सासवड गावाजवळ आईचा, कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ आठ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. तर या मुलाचे वडील बेपत्ता आहेत. सापडलेल्या दोन्ही मृतदेहाच्या अंगावर जखमा आढळल्यामुळे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले असावेत. पोलीस या गुन्ह्याचा शोध घेत आहेत.

मयत महिलेचे नाव आलिया आबिदा शेख आणि मुलाचे नाव आयान शेख असे आहे. महिलेच्या खुनप्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर भारती विद्यापीठ पोलीस गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत. पोलिसांनी या गुन्ह्याच्या शोध सुरू केला असता या महिलेची चारचाकी गाडी पुणे-सातारा रस्त्यावरील एका चित्रपटगृहासमोर आढळली आहे. त्यामुळेे या खून प्रकरणात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती हे पुण्यातील धानोरी परिसरातील रहिवाशी आहेत. आज सकाळच्या सुमारास सासवड जवळील खळद गावाजवळ यातील महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला. प्राथमिक चौकशीत हा खुनाचा प्रकार असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली होती. मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी तिचे फोटो पुणे शहर आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात पाठवले होते.

दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास कात्रज बोगद्याजवळ आठ वर्षीय मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरवात केली असता महिला आणि हा मुलगा माय-लेक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर हे दोघे धानोरी भागातील असल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक तपासात दोघेही दोन ते तीन दिवसांपूर्वी पिकनिक साठी म्हणून घराबाहेर पडले असल्याचे समोर आले आहे. तर सातारा रस्त्यावरील एका चित्रपट गृहा जवळ त्यांची कार सापडल्यामुळे या प्रकारात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्या दोघांचाही खून करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आला असावा असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn