Pune : कसबा पेठेत अज्ञाताने पहाटे ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवली रिक्षा

एमपीसी न्यूज – ज्वलनशील पदार्थ टाकून रिक्षा पेटवल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी (दि.30) पहाटे साडेतीनच्या दरम्यान कसबा पेठ येथील भोईरात विठ्ठल मंदिराजवळ घडली.

याप्रकरणी योगेश काथवटे (वय 38, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी योगेश यांनी कसबा पेठ येथील भोईरात विठ्ठल मंदिराजवळ त्यांची रिक्षा पार्क केली होती. परंतू त्या रिक्षावर ज्वलनशील पदार्थ टाकून रिक्षा पेटवून दिली. त्यामूळे रिक्षाचे 1 लाख 50 हजारांचे नुकसान तीचे नुकसान केले. ही रिक्षा कोणी व का पेटवली हे अद्याप समजू शकले नाही.

याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फरासखाना पोलीस  करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.