Pune Leopard Fear : पुण्यातील कात्रज परिसरात दोन बिबट्यांचा वावर, पाळीव श्वान केले फस्त

एमपीसी न्यूज – पुण्यातील कात्रज परिसरात मागील काही दिवसांपासून दोन बिबट्यांचा (Pune Leopard Fear) वावर असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. कात्रजघाट लगत असलेल्या भिलारेवाडी परिसरातून एका पाळीव श्वानाला घराच्या दारातून ओढून नेत बिबट्याने फस्त केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भिलारेवाडी येथील नागरिक संभाजी धनावडे यांच्या घरासमोरील पाळीव श्वानाला बिबट्याने फरफटत नेले आणि त्याला फस्त केले. मागील दहा ते बारा दिवसांपासून या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कात्रज घाटाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगल क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. डोंगर भागात मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. काही स्थानिक नागरिक कात्रज घाट परिसरात रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यासाठी जात असतात. या मोकळ्या कचऱ्यावर मोठ्या प्रमाणात डुकरे फिरत असतात. त्यामुळे बिबट्या (Pune Leopard Fear) त्याची शिकार करण्यासाठी या परिसरात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Pune Water Cut : जूनअखेरही पाऊस गायब, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

खेड शिवापुर परिसरातील वनपाल विशाल यादव यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. या परिसरातील वनक्षेत्रात दोन बिबट्यांचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि संध्याकाळी व सकाळच्या वेळी काही कारण नसताना वनक्षेत्रात फिरू नये तसेच लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.