Pune News : पुण्याच्या कोथरूड परिसरात अवतरला भलामोठा गवा

पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

एमपीसी न्यूज : थंडीच्या हंगामात भल्या पहाटे पुण्याच्या कोथरूड परिसरात एक गवा अवतरल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यासारख्या शहरात गव्याचे दर्शन झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शहरातील कोथरूड परिसरातल्या महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एक मध्ये हा गवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना दिसला. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही काळाने तो गवा असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली.

MPC News Exclusive : 20 वर्षांपूर्वी पुण्यात आढळला होता रानगवा; जंगलात सुखरूप झाली होती रवानगी!

त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी या गव्यापासून दूर पळ काढला. या गव्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. तब्बल दहा फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा गवा मोकळ्या जागेमध्ये शिरला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

Pune News : चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान रानगव्याचा मृत्यू !

दरम्यान गवा असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती वनविभाग आणि पुणे महापालिकेला कळवली. वन विभागाचे अधिकारी सध्या घटनास्थळी दाखल झाले असून त्या गव्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गवा हा जंगल परिसरात राहणारा प्राणी असल्याने तो कोथरूडमध्ये कसा आला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.