India Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 11,427 नवे रुग्ण, 118 मृत्यू 

रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर   

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत 11 हजार 427 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 118 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 07 लाख 57 हजार 610 एवढी झाली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 858 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 04 लाख 34 हजार 983 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोना रिकव्हरी रेट 97 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 70 लाख 92 हजार 635 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 5 लाख 4 हजार 263 नमून्यांची तपासणी रविवारी (दि.31) करण्यात आली आहे.

सध्या देशात 1 लाख 68 हजार 235 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 118 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 54 हजार 392 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 37 लाख 58 हजार 843 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.