India Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 15,510 नवे रुग्ण, 106 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 15 हजार 510 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 106 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात झालेल्या वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 11 लाख 12 हजार 241 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 07 लाख 86 हजार 457 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांत देशभरात 11 हजार 288 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.  

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 21 कोटी 68 लाख 58 हजार 774 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 6 लाख 27 हजार 668 नमून्यांची तपासणी रविवारी (दि.28) करण्यात आली आहे.

सध्याच्या घडीला देशात 1 लाख 68 हजार 627 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 106 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 157 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.10 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 01 हजार 266 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.