India Corona Update : गेल्या 24 तासांत 18,222 नवे रुग्ण, 228 जणांचा मृत्यू  

एमपीसी न्यूज : देशात मागील 24 तासांत 18 हजार 228 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 228 जणांचा मृत्यू झाला आहे. यावाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 04 लाख 31 हजार 639 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशभरात 19 हजार 253 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 कोटी 56 हजार 651 एवढी झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 2 लाख 24 हजार 190 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजवर देशात 18 कोटी 02 लाख 53 हजार 315 नमूणे तपासण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि.9) त्यापैकी 9 लाख 16 हजार 951 नमूणे तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशभरात आजवर 1 लाख 50 हजार 798 एवढे रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या 24 तासांत 228 रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 96.38 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.